गुहागर; आजपासून या दोन गावातील प्रत्येक घरातील माणसाची कोव्हिडं तपासणी होणार – नेत्रा ठाकूर

0
2130
बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर तालुक्यात गेल्या पंधरा दिवसात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या पाहून आज तालुक्यातील कोतळूक आणि मढाळ या गावी प्रत्येक घरा घरात जाऊन आरोग्य पथक तपासणी करणार असल्याची माहिती वेळणेश्वर जिल्हा परिषद सदस्य नेत्रा ठाकूर यांनी दिली.

गुहागर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून आता तालुक्यात ऍक्टिव्ह पॉझिटिव रुग्णांची संख्या 286 झाली आहे. यामध्ये सर्वात जास्त रुग्ण हे कोतळूक आणि मढाळ या गावचे असून या गावात भीतीचे वातावरण पसरले या गावातील नागरिकांच्या मनातून कोरोनाबाबत असलेले गैरसमज दूर होऊन नागरिकांच्या मनातील भीती दूर व्हावी तसेच गावातील कोरोनाची साथ आटोक्यात यावी यासाठी आजपासून या गावांमध्ये घरपट टेस्ट करण्यात येणार आहे. यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असा आव्हान शिवसेना नेत्या आणि जिल्हा परिषद सदस्यांनी नेत्रा ठाकूर यांनी केले आहे. या गावात आतापर्यंत अनेक जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने हा निर्णय घेण्यात आला असून एखाद्या गावाने जर आमच्या गावाची संपूर्ण तपासणी व्हावी अशी मागणी केली तर त्या गावात सुद्धा हा कार्यक्रम घेतला जाईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here