दापोली – दापोली तालुक्यातील वाकवली येथे जुगार खेळत असलेल्या ठिकाणी दापोली पोलिस ठाण्याचे प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाड टाकुन ९ हजार २५० रुपये रोख रकमेसह जुगार खेळणाऱ्या ६ संशयितांना ताब्यात घेतले. वाकवली नवानगर येथे जुगार खेळला जातो याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी राठोड, पोलिस हे.कॉ. ए. एस. गायकवाड व पोलिस कॉन्स्टेबल सुजित तळवटकर हे १० एप्रिल रोजी सायंकाळी ५ वा.च्या सुमारास वाकवली नावनागर येथील जोशी बागे शेजारी संशयित अजय मोरे, संजय मोरे, बाबासाहेब जाधव, सलमान शेख, अशोक जाधव आणि मंगेश जाधव हे तेरा पानी (रमी) जुगार खेळताना आढळून आले. या घटनेचा तपास हे.कॉ. गायकवाड करीत आहेत.