कोकण रेल्वेत विना मास्क वाल्या मंडळींवर कारवाई

0
131
बातम्या शेअर करा

रत्नागिरी -कोव्हिडचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून अनेक पाऊले उचलली जात आहेत. कोकण रेल्वेच्या स्थानक परिसरात आणि प्रवासा दरम्यान मास्क न वापरणाऱ्या मंडळींवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. कोव्हिड रोखण्यासाठी प्रशासन सर्व ती सगळी खबरदारी घेत आहे. कोकण रेल्वेने हि निर्बंधांच्या कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. ट्रेन मधून प्रवास करताना मास्क न वापरणाऱ्या मंडळी वर कारवाई सुरू झाली आहे. कोकण रेल्वेच्या मार्गावर धावणाऱ्या सगळ्या गाड्यांमध्ये तपासणी केली जात आहे.

मास्क न वापरणाऱ्या मंडळीं कडून प्रती व्यक्ती 500 रुपये दंड घेतला जात आहे. ट्रेन प्रमाणे स्थानक परिसरात हि मास्क न वापरणाऱ्या मंडळी विरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे. कोकण रेल्वेत सध्या आरक्षण असलेल्या प्रवाश्यांनाच प्रवेश दिला जातोय. यामुळे कोकण रेल्वेतून प्रवास करणाऱ्या मंडळींना मास्कच्या वापरा बरोबरच कोव्हिड प्रतिबंधासाठीचे सर्व नियम पाळण्याच आव्हान कोकण रेल्वेने केले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here