दापोली -दापोली तालुक्यातील साकुर्डे येथील एका तरुणाचा बंदुकीची गोळी लागुन दुर्दैवी मृत्यू झाल्याची हदयद्रावक घटना घडली आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, साकुर्डे गनेशनगर (जंगमवाडी ) येथील विनोद मनोहर बैकर (वय 33) हा तरुण बुधवार दि. 31 मार्च रोजी सकाळी गावाजवळ असणार्या रहाटिमधे शिकारिसाठी गेला होता. जाताना त्याने जवळच्या वाडीतील तरूणाला शिकारिसाठी येतोय का असे हटकले होते, मात्र मला घरी काम असल्याचे सांगून त्यानेही जाण्यास असमर्थता दाखविली होती, नाईलाजास्तव तो एकटाच गेला होता. सकाळी साडेअकरा वाजनेचे सुमारास रहाटीमधून बन्दुकिचा आवाज आला. विनोदने शिकार केली म्हणून काम करित असलेला तरुण रहाटिकडे धावला.
रहाटिमधे गेल्यावर विनोद कुठच दिसेना म्हणून तो विनोदला हाका मारु लागला. मात्र विनोद काहिच प्रतिसाद देत नसल्याने त्याने शोधाशोध केली असता, विनोद एका दगडाजवल त्याला रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. विनोद याच्या बेन्बीच्या खालील भागास त्याच्याच बंदुकीची गोळी लागल्याचे प्रथमदर्शनी बोलले जात आहे.
विनोद हा विवाहित असुन त्याला 2 मुले आहेत. या बाबत दापोली पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
दरम्यान, विनोद एकटाच शिकारिसाठी कसा गेला, त्याच्या ताब्यात असणारी सिंगल बोअरची बन्दुक कुणाच्या मालकीची याचा तपास दापोली पोलिस घेत आहेत.