शुंगारतळी – गुहागर तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठेत आज पाच हजार रुपये आणि पिशवीसह पडलेलं पाकीट याच बाजारपेठेत रस्त्यावर छोटसं बांगड्या विकणाऱ्या दुकानदार असणाऱ्या महिलेनं परत केल्याने तिच्या प्रामाणिकपणाचा सर्वत्र कौतुक होत आहे.
आज सकाळी धोपावे येथील आनंद शिंदे काही कामानिमित्त शृंगारतळी येथे आले होते. त्यावेळेला त्यांच्याकडून त्यांच्या हातातील पिशवी ही पडली मात्र ते त्यांच्या लक्षात आले नाही. ज्या वेळेला त्यांच्या लक्षात आले त्या वेळेला त्यांची घाबरगुंडी उडाली मात्र याच वेळी सदर पिशवी शुंगारतळी बाजारपेठेत बांगड्यांचा व्यवसाय करणाऱ्या
*दीपाली पवार राहणार जानवळे* या महिलेला सापडली त्यांनी यासंदर्भात शुंगारतळीतील कर्तव्यावर असणारे पोलीस कर्मचारी राजू कांबळे आणि प्रितेश रहाटे त्याच वेळी या दोन्ही पोलिसांनी आणि त्या महिलेने सदर व्यक्तीला शोधत त्या व्यक्तीला ती पिशवी परत केली त्यावेळी लक्षात आले की या पिशवीत पाच हजार रुपये आणि महत्वाची कागदपत्र होते या महिलेच्या या प्रामाणिकपणामुळे तिथं सर्वत्र कौतुक होते.