चिपळूण -(विशेष प्रतिनिधी ) -रत्नागिरी जिल्ह्याचे नाव सचिन वाझे प्रकरणात आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मूळचे खेड तालुक्यातील खोपी येथे राहणारे विजयकुमार भोसले यांची प्रॉडो गाडी सचिन वाजे वापरत असल्याची माहिती ए एन आय तपासात समजले तसे वृत्त एका संस्थेने दिल्याने सर्वत्र खळबळ उडाली.
2014 मध्ये सेनेचे उमेदवार म्हणून विजयकुमार भोसले यानी गुहागर विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यांच्या विरोधात त्या वेळी राष्ट्रवादीत असणारे आमदार भास्कर जाधव होते .परंतु गुहागर खेडच्या व रत्नागिरी जिल्ह्यातील लोकांना विजयकुमार भोसले यांची तेवढीच ओळख होती.
परंतु आता सचिन वाजे प्रकरणात त्यांचे नाव आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत विजयकुमार भोसले यांचे चिरंजीव डॉक्टर गणेश राजे भोसले यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.
डॉ. गणेश राजे भोसले यांनी सांगितले की ती गाडी आम्ही ओएलएक्स ऑटो कंपनीला दोन वर्षांपूर्वी विकली होती. यापूर्वी त्यांनी ती गाडी नऊ वर्षे वापरली होती. गाडी प्रीमियर असल्याने गाडीला योग्य भाव येत नव्हता. त्यामुळे त्यांनी ती ओएलएक्स ऑटो कंपनीला विकली. कंपनीने 23लाख 50 हजार रुपये त्याच्या खात्यात जमा केले होते.
ऑफ लाईन कागदपत्राचा व्यवहारही त्यांनी पूर्ण केला होता .परंतु गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यातच महिन्यातच ओएलएक्स कंपनीकडून त्यांना गाडी ट्रान्सफर झाली असे सांगण्यात आले. परंतू दोन दिवसा पासून येणाऱ्या बातम्या बघून कंपनीला याबाबत वकिलामार्फत नोटीस पाठवलेली आहे त्यांनी कंपनीवर विश्वास ठेवला कंपनीचं म्हणणं होतं की गाडी सुखरूप आहे त्यांच्या वेअरहाऊस मध्ये आहे . पण आज जेव्हा डॉक्टर गणेश राजे भोसले यांनी कंपनीच्या ऑफिसमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. तेव्हा ही कंपनी किंवा हे लोक कस्टमरला कधीच सेलर ची भेट घालून देत नाही .दोन वर्षानंतर सेलर असे नाव दिलेले आहे.विक्री झालेली असल्यामुळे त्यांचा गाडीची काही संबंध नाही.
दरम्यान चारकोप पोलीस ठाण्यात डॉक्टर गणेश राजे भोसले यांनी या ओएलएक्स कंपनीने आतापर्यंत गाडी रजिस्टर न केल्या बद्दल तक्रार दाखल केलेली आहे .त्या गाडीचे ते 23 लाख 50 हजार रुपये आर टी जी करून भोसले यांच्या अकाउंट वर जमा झालेले आहे. याबाबत बोलताना डॉक्टर गणेश राजे भोसले यांनी सांगितले की माझे वडील गेले 35 वर्ष सेनेचे काम करत होते .परंतु आता त्यांनी ते काम थांबवलेल आहे. आता त्यांच्या निवृत्तीच्या काळात असा संबंध जोडणे चांगली नसल्याने त्यांचे निवृत्तीचे आयुष्य हे त्यांना चांगले सुखाने जगू द्यावी अशी विनंती त्यांनी पत्रकारांना केली आहे.