रत्नागिरी- विश्व समता मंच लोवले,संगमेश्वर या संस्थेचा १५ वा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा नुकताच उत्साहात संपन्न झाला. ही संस्था गेली १५ वर्षे कला,सामाजिक,शैक्षणिक,क्रिडा,सांस्कृतिक,पत्रकारिता,जल अशा विविध क्षेत्रांत काम करणाऱ्यांचा गौरव करत असते. या कार्यक्रमात दिवंगत सुनिल पवार सर यांचा १० व्या स्मृतीदिनानिमित्त श्रद्धांजली वाहण्यात आली. त्याचबरोबर संस्थेचा १५ वा राज्यस्तरीय विश्व समता पुरस्कार वितरण समारंभ ही सादरा करण्यात आला. यामध्ये सुनिल स्मृती राज्यस्तरीय पत्रभुषण पुरस्कार, राज्यस्तरीय विश्व समता काव्यगौरव पुरस्कार, राज्यस्तरीय धम्मभुषण पुरस्कार,१५ वा राज्यस्तरीय विश्व समता पुरस्कार अशा विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.१५ वा राज्यस्तरीय विश्व समता पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्यातुन प्रस्ताव मागवण्यात आले होते. एकुण ८० प्रस्ताव संस्थेकडे आले होते, त्यातुन ३२ प्रस्तावांची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे यावेळी जलसाकार मंडळींचा ही राज्यस्तरीय धम्मभुषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. जलसाकार मंडळींचा सन्मान करणारी ही पहिलीच संस्था असेल असे उद्गार प्रमुख पाहुण्यांनी काढले. पुरस्कार प्राप्त व्यक्तींना मानपत्र,सन्मानचिन्ह,मानाचा पट्टा देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मनोज जाधव, नयना जाधव,कोमल शिवगण, सुनिल सुरेखा, विनोद जाधव, राहुल सावंत, युयुत्सु आर्ते, गणेश मोरे, रिझवाना मोडक, संजय सुतार,सुनिल जाधव, मारुतीकाका जोशी,राष्ट्रपाल सावंत इत्यादी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.