चिपळूण; सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर 64 महिलांनच्या हाती ग्रामपंचायत कारभार

0
463
बातम्या शेअर करा

चिपळूण – चिपळूण तालुक्यातील नुकत्याच झालेल्या ८३ ग्रामपंचायत निवडणुकांच्या सरपंच पदासह पुढे होणाऱ्या ४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच आरक्षण जाहीर झाले असून या आरक्षण सोडतीनंतर बऱ्याच उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. यामध्ये खेर्डी ग्रामपंचायतीसाठी ओबीसी स्त्री राखीव आरक्षण तर सावर्डे येथे सर्वसाधारण स्त्री राखीव अशा महत्वाच्या ग्रामपंचायतीमध्ये आरक्षण पडल्याने सरपंच पदासाठी इच्छुक असलेल्यांचा हिरमोड झाला आहे. यामुळे आता सरपंच पदासाठी इच्छुक असलेल्या सदस्यांना उपसरपंच पदावर समाधान मानावे लागणार आहे.

चिपळूण तालुक्यातील सरपंच पदासाठी आरक्षण पुढील प्रमाणे

अनुसूचित जाती प्रवर्गासाठी

धामणवणे, कळंबस्ते, कुंभार्ली, अनुसुचित जाती स्त्री वर्गासाठी ओमळी, देवखेरकी,

अनुसूचित जमाती प्रवर्गाकरता कळकवणे दादर,

अनुसूचित जमाती स्त्री राखीव
ओवळी,

नागरीकांचा मागास प्रवर्ग करता

पोसरे, गुढे, डुगवे, ढोक्रवली, धामेलीकोंड, आंबतखोल, कळवंडे, नांदगाव खुर्द, पाचाड, पोफळी, येगाव, रेहेळवैजी, चिंचघरी, वाघिवरे, पिलवली तर्फे वेळंब, मार्गताम्हाणे, मांडकी खुर्द,

नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव

दळवटणे, अडरे- मांडवखरी, पिंपळी बुद्रुक, कोंढे, पिलवली तर्फे सावर्डे, शिरवली, कामथे, भिले, खांदाटपाली, कालुस्ते खुर्द, खेर्डी, बिवली, कौंढरताम्हणे, कळंबट, पिंपळी खुर्द, कामथे खुर्द,

सर्वसाधारण स्‍त्री राखीव

कोकरे, खेरशेत, नांदगाव, मांडकी, कापरे, कोसबी दहिवली खुर्द, दहिवली बुद्रुक, तिवडी, आकले, गाणे, मोरवणे, वालोटी, परशुराम, पेढे, निवळी, उभळे आगरगाव, कळमुंडी, मिरवणे, वडेरु, खंडोत्री, पेढांबे,, कोळकेवाडी, अलोरे, दोणवली, कुशिवडे, नांदिवसे, मुर्तवडे शिरगाव भूम ते बुद्रुक सावर्डे, हडकणी, पालवण, वीर-देवपाट, मालदोली, खडपोली,

सर्वसाधारण प्रवर्ग करिता

आगवे, गोंधळे, कुटरे, रामपूर, गुळवणे, तनाळी, आंबेरे बुद्रुक, निरबाडे, बोरगाव, कान्हे, कोंडमळा, खरवते, कापसाळ, लोणारी बंदर चिवेली, नागावे, फुरुस, मुंढेतर्फे चिपळूण, मिरजोळी, कात्रोळी, वहाळ, केतकी, दुर्गेवाडी, रिकटोली, नवीन कोळकेवाडी, मार्गताम्हाने खुर्द, आबिटगाव, करंबवणे, मुंढे तर्फे सावर्डे, तोंडली, वेहेळे, तळवडे, वालोपे, नारदखेरकी, कादवड, बामणोली, मालघर, रावळगाव, खोपड, गंग्रई असे आरक्षण पडले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here