दापोली ; लाडघर सायकल शर्यत ,प्रशांत पालवणकर, प्रथम

0
418
बातम्या शेअर करा

दापोली – श्री दत्त सांस्कृतिक मंडळ लाडघर तालुका दापोली तर्फे दरवर्षी होणाऱ्या सायकल आणि धावण्याच्या शर्यती नुकत्याच पार पडला

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सायंकाळी लाडघर बीच येथे उत्साहात पार पडल्या. या शर्यतीमध्ये भाग घेण्यासाठी दूरवरुन अनेक स्पर्धक आले होते. या सायकल शर्यतीत पहिला क्रमांक प्रशांत पालवणकर, दुसरा केतन पालवणकर आणि तिसरा नंबर अक्षय मंडपे यांनी पटकावला. तर सर्वात छोटे सायकलस्वार स्वराज संजय मांजरे यांना खास बक्षीस देण्यात आले. धावण्याच्या शर्यतीत पहिला, दुसरा, तिसरा नंबर अनुक्रमे ऋतुराज घाग, निनाद चोगले आणि अक्षय शिंदे यांनी पटकावला.
लाडघर दत्त मंदिर येथे साजऱ्या होणाऱ्या दत्तजयंती निमित्त अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. श्री दत्त सांस्कृतिक मंडळ लाडघर याचे अध्यक्ष सुभाष पेडणेकर, उपाध्यक्ष निलेश मोरे आणि सचिव राजन सनकुळकर यांनी याबद्दल अधिक माहिती देताना सांगितले की १९६५ पासून या मंडळातर्फे सायकल आणि धावण्याच्या शर्यती आयोजित केल्या जात आहेत. यातील सायकल शर्यतीचे अंतर ३ किमी आहे, परंतु लाडघर समुद्र किनाऱ्यावर वाळूमध्ये वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने सायकल चालवणे हे आव्हानात्मक असते. त्यामुळे ही सायकल शर्यत पाहण्यासाठी आणि त्यामध्ये भाग घेण्यासाठी भरपूर गर्दी जमते. यावर्षी या शर्यती सुरळीत पार पडाव्यात यासाठी प्रदीप नार्वेकर, हृदयनाथ कर्देकर, वैभव कर्देकर, उदय पेडणेकर, राजेश्वर सुर्वे, सुरेंद्र मोरे, भाई पेडणेकर आणि लाडघर ग्रामस्थांनी बहुमोल सहकार्य केले. सर्व विजेत्यांचा बक्षीस आणि चषक देऊन सत्कार करण्यात आला. या विजेत्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. सर्वांनी आपल्या दैनंदिन जीवनात सायकलचा जास्तीच जास्त वापर करुन पर्यावरण जपुया आणि आपले आरोग्य तंदुरुस्त बनवूया असे आवाहन श्री दत्त सांस्कृतिक मंडळाने केले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here