वाई – तृप्ती लॉज वर छापा, पाच जणांवर गुन्हा दाखल

0
498
बातम्या शेअर करा

वाई – (प्रवीण गाडे )- सातारा जिल्ह्यातील वाई शहरातील जयदीप खामकर यांचे मालकीचे असणार्या तृत्पी लॉजवर वाई पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे आढळून आले पोलिसांनी टाकलेल्या या छाप्यात तृप्ती लॉजचे मालक व आरोपी असलेले जयदीप खामकर मॅनेजर बसराज मान्याळ आणी लॉज मालकाला बायका आणी मुली पुरविणारा नवनाथ ऊर्फ पप्या अनिल जाधव राहणार बावधन ता,वाई यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन वाई पोलिस ठाण्यात आणुन त्यांच्या वर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे .
वाई पोलिसांनकडून मिळालेली माहिती अशी की वाई शहराच्या मध्य वस्तीत असणार्या तृप्ती लॉज मध्ये वेश्या व्यवसाय राजरोस पणे गेली कित्येक दिवसांपासून चालविला जातो याची माहिती वाई पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांना खास खबर्या मार्फत माहिती मिळताच त्यांनी खात्री करण्यासाठी तृप्ती लॉज वर बोगस गिराईक पाठवुन खात्री करुन घेतल्या नंतर तेथे छापा टाकण्याची जबाबदारी टिबी विभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय शिर्के कृष्णराज पवार किरण निंबाळकर सोमनाथ बल्लाळ श्रावण राठोड अक्षय नेवसे महिला पोलिस सोनाली माने दिपा निकम या नेमलेल्या पथकावर सोपवली होती या पथकाने धाडसाने तृप्ती लॉज वर छापा टाकला असता त्या ठिकाणी वेश्या व्यवसाय करण्यासाठी आलेल्या दोन महिलांन सह लॉज मालक जयदीप खामकर राहणार ब्राम्हणशाही वाई मॅनेजर बसराज मानीक मान्याळ राहणार वाई व या लॉज वर बायका आणी मुली पुरविणारा नवनाथ ऊर्फ पप्या अनिल जाधव राहणार बावधन ता,वाई यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन वाई पोलिस ठाण्यात आणुन त्यांच्या वर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे .


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here