गुहागर ; विहिरीत उडी मारून त्याने केली आत्महत्या…?

0
542
बातम्या शेअर करा

शुंगारतळी – गुहागर तालुक्यातील गिमवी वरचीवाडी येथे नारळी पोफळीच्या बागेमधील विहीरीत अजय रामचंद्र जाधव रा. गिमवी यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेची खबर अजय जाधव यांची पत्नी अमृता जाधव हिने गुहागर पोलीसांना दिली.

अजय जाधव याला दारु पिण्याचे व्यसन होते. तसेच ते अधुनमधून वेड्यासारखे करायचे. वेडाच्या लहरी आजारपणावर कोणत्याही दवाखान्यात औषधोपचार केला जात नव्हता. 3 नोव्हेंबरला रात्री 1 च्या दरम्यान ते घराबाहेर गेले. मात्र सकाळी सकाळी 6 वाजेपर्यंत ते आले नाहीत. म्हणून घरच्या मंडळींनी घराच्या आजुबाजुला अजय दिसतो काय याची पहाणी केली. तेव्हा घराचे पाठीमागील बाजूर असलेल्या नारळी पोफळीच्या बागेतील विहीरीत अजयचा मृतदेह आढळून आला. वेडाच्या भरात अजय यांनी विहीरीत उडी मारली असावी असा संशय अस्मिता जाधव यांनी व्यक्त केला आहे. पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांनी घटनास्थळाला जावून माहिती घेतली याबाबत गुहागर पोलीसांनी आकस्मिक मृत्यू झाल्याची नोंद केली आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल हनुमंत नलावडे करत आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here