गुहागर -विजापूर रस्ता रुंदीकरण ; शुंगारतळी येथे आज प्रांतअधिकारी व ग्रामस्थ यांची बैठक

0
486
बातम्या शेअर करा

गुहागर – (तेजस आंबेकर )- गुहागर-विजापूर या
प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गासाठी शृंगारतळी येथे आज २९ ऑक्टोबर रोजी पाटपन्हाळे ग्रामपंचायत सभागृहात
एका महत्त्वाच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.चिपळूणचे प्रांतअधिकारी यांनी बोलावलेल्या या सभेसाठी महामार्गाचे सर्व अधिकारी, भूमी अभिलेखचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

गुहागर-विजापूर या प्रस्तावित महामार्ग क्रमांक १६६ ई’चे काम मंजूर होऊन बराच कालावधी लोटला, परंतु खुद्द गुहागरच्या ‘झिरो पॉइंट’पासून म्हणावी तशी कामाला अद्याप गती नाही.खुद्द गुहागरमध्ये भू संपादन रखडले असून येथे रुंदीकरणात किती जागा जाणार, एस.टी.आगरा समोराच्या रस्त्याच्या कडेला लागून असलेल्या दुकानांचे काय होणार असे अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याने रस्त्याचे काम रखडले आहेत. मात्र याबाबत नुकतीच एक बैठक होऊन हा विषय मिटत आला आहे त्यामुळे आता हळू हळू रस्त्याचे काम पुढे सरकत आहे. या महामार्गावरच मोठी बाजारपेठ शृंगारतळी येथे आहे.
रस्त्याला आवश्यक असणारी रुंदी बाजारपेठेत आहे तरीही येथील व्यापाऱ्यांच्या मनात निश्चित जागा किती जाणार याबाबत संभ्रम आहे. बाजारपेठेत दोन मोठे पूल असून या पुलावर लागून काही दुकाने उभी राहिली आहेत, त्यांचे या रुंदीकरणात काय होणार अशाही शंका आहेत. पाटपन्हाळे ग्रामपंचायतच्या मागणीनुसार चिपळूणचे उपविभागीय अधिकारी यांनी ही बैठक बोलावली असून या बैठकीसाठी सार्वजनिक बांधकामचे उप अभियंता, भूमी अभिलेखचे अधिकारी उस्थित राहणार आहेत.महामार्गाचे काम लवकर
पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून व शृंगारतळी बाजारपेठेच्या दृष्टीने आजची ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here