रायगड – ऐन गणेशोत्सवाच्या कालावधीत कोकण रेल्वे मार्गावर सध्या विद्युतीकरणाचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे हे काम चालू असताना आज करंजाडी येथील साइटवर यूटीव्ही मशीन रुळावरून खाली घसरले हा प्रकार आज पहाटे झाला मात्र याचा वाहतुकीवर कोणताही परिणाम कोकण रेल्वेच्या वाहतुकीवर झालेला नाही. यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे.
