कोरोना आपत्तीमुळे शृंगारतळी बाजारपेठेतील यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव रद्द

0
334
बातम्या शेअर करा

शृंगारतळी – गुहागर तालुक्यातील मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या शृंगारतळी बाजारपेठेमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ शृंगारतळीतर्फे साजरा होणारा यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या आपत्तीमुळे रद्द करण्यात आला असल्याची माहिती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ शृंगारतळीचे अध्यक्ष अरूण गांधी यांनी दिली आहे. 

गुहागर तालुक्यात कोरोनाचा प्राद्रुर्भाव वाढता असल्याने व आगामी गणेशोत्सवाच्या खरेदी साठी बाजारपेठेत गर्दी होणार असल्याने दक्षता व प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शृंगारतळी बाजारपेठेतील सार्वजनिक गणेशोत्सव यंदा रद्द करण्यात येत असल्याचे मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत ठरविण्यात आल्याची माहिती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ शृंगारतळीचे अध्यक्ष अरूण गांधी यांनी दिली. पुढील वर्षी सदर मंडळाचा गणेशोत्सव उत्साहात व आनंदी वातावरणात संपन्न होईल असे अध्यक्ष अरूण गांधी यांनी सांगितले.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here