गुहागर ; मनसेच्या वतीने पत्रकारांचा कोवीड योध्दा सन्मान

0
102
बातम्या शेअर करा

गुहागर – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोकणचे नेते शिरीष सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर तालुका मनसेच्यावतीने तालुक्यातील पत्रकारांचा कोवीड योध्दा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी पत्रकारांना मास्क व छत्र्यांचे वाटप करण्यात आले. पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी गुहागर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मयुरेश पाटणकर, गुहागर तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष दिनेश चव्हाण, मनसे तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर, माजी तालुकाध्यक्ष राजेश शेट्ये, महिला अध्यक्ष तानीया ठाकूर, विभागप्रमुख मयुरेश शिगवण, वेलदूर विभाग अध्यक्ष तेजस पोफळे, मनसे पदाधिकारी सौ. जानवळकर, सर्व कार्यकर्ते व पत्रकार उपस्थित होते. हा कार्यक्रम मनसेचे वरिष्ठ नेते राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर, रत्नागिरी जिल्हा संपर्क अध्यक्ष अनिल खानविलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाप्रमुख विनोद जानवलकर व कार्यकर्त्यांनी पार पाडला. या कार्यक्रमासाठी लागणारी सर्व साम्रगी ज्येष्ठ व्यवसायिक प्रमोद गांधी यांनी पुरविली.

गुहागर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची गेले वर्षभर घोडदौड सुरु आहे. अनेक उपक्रम, कार्यक्रम त्यांनी राबविले आहेत. कमी कालावधीत गुहागरमध्ये अनेक उपक्रम करून घेणारा व चर्चेत येणारा असा पक्षाचा नावलौकीक आहे. कोवीड काळात मनसेने अनेक उपक्रम राबविले. तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वेळणेश्वर वाडदई, जानवळे, तळवली या ग्रामपंचायतींमध्ये सॅनिटाझर, मास्क, पीपीई कीट व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे. राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महामार्गावर वृक्षारोपण, चिखली प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रूग्णालय गुहागर येथे कोविड योध्दयांचा सन्मान व रूग्णांना खाऊ वाटप करण्यात आले होते.

तालुक्यातील वादळग्रस्तांना मोफत धान्य वाटप, कोवीड आपत्तीत रुग्णांना औषधे वाटप असे उपक्रम राबविण्यात आले. नुकताच गुहागर-विजापूर मार्गावरील गिमवी ते मोडकाघर दरम्यान, रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड कार्यक्रम, पोलीस व होमगार्ड जवानांना रेनकोट वाटप करण्यात आले होते. या अभिनव उपक्रमाने गुहागर मनसेचे नाव उंचावले. एवढ्या मोठ्या प्रमाणात उपक्रम राबविणारा तालुक्यात एकमेव पक्ष गुहागर मनसे ठरला. तालुकाध्यक्ष विनोद जानवलकर यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गुहागरमध्ये मनसेचे उपक्रम राबवून एक वेगळा आदर्श समोर ठेवला आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here