बातम्या शेअर करा

गुहागर – निसर्गरम्य गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावरील बांधण्यात आलेल्या सीव्ह्यु गॅलरी आज अखेर तोडण्यात आल्या. हरित लवादाच्या आदेशांमुळे गेली ८ वर्ष गुहागरच्या समुद्रकिनाऱ्याची ओळख बनलेल्या या सीव्हू गॅलरी अखेर जमीनदोस्त झाल्या.

गुहागर समुद्रकिनाऱ्यावरील तीनही सीव्ह्यू गॅलरी तोडण्याचे काम सुरू आहे. गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावरील तीन सीव्ह्यू गॅलरी आणि एक जेटी आहे. हे सर्व सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करुन बांधण्यात आले होते. त्याप्रमाणे गुहागर शहरात सीआरझेडची परवानागी न घेता अनेक अनिधिकृत बांधकामे उभी आहेत. अशा तीन स्वतंत्र तक्रारी बळवंत परचुरे यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे केल्या आहेत. या तीन केसच्या स्वतंत्र सुनावण्यांमध्ये हरित लवादाने शासनाला जेटी, समुद्रदर्शनी पाडण्याचे तसेच अनधिकृत बांधकामांवर काय कारवाई करण्यात आली याची माहिती देण्याचे आदेश दिले. त्याचाच एक भाग म्हणून गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावरील सीव्ह्यू गॅलरी तोडण्याच्या कामाला आज सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरवात केली.
ही गॅलरी तोडताना प्रांतअधिकारी प्रवीण पवार गुहागरचे पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांच्यासहित बांधकाम विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here