मार्गताम्हाणे येथील सुपुत्र उद्योजक निलेश चव्हाण यांचा ‘फेमस अवॉर्ड ‘२०२५’ ने गौरव

0
1
बातम्या शेअर करा

नागपूर – कोकणचे सुपुत्र उद्योजक, स्कॉन प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक निलेश शंकरराव चव्हाण यांना ‘फेमस अवॉर्ड २०२५’ या प्रतिष्ठित पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांच्याहस्ते नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या एका शानदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला.

औद्योगिक बांधकाम क्षेत्रात त्यांनी केलेले उल्लेखनीय, नाविन्यपूर्ण आणि समाजोपयोगी कार्य, तसेच देशाच्या औद्योगिक विकासात दिलेल्या मौल्यवान योगदानाची दखल घेत त्यांना हा बहुमान देण्यात आला. उद्योजक निलेश चव्हाण यांच्या दूरदृष्टी, कार्यशक्ती आणि नेतृत्वगुणांमुळे औद्योगिक क्षेत्रात नवे मानदंड निर्माण झाले असून, त्यांची वाटचाल नव्या पिढीसाठी आदर्श व प्रेरणास्थान ठरणार असल्याचे गौरवउद्गार नितीन गडकरी यांनी याप्रसंगी काढले.

गेल्याच आठवड्यात उद्योजक चव्हाण यांच्या स्कॉन प्रोजेक्ट कंपनीला तब्बल पाच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांचे व कंपनीतील संपूर्ण टीमचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. तर कोकणवासीयांसाठी मानाचा तुरा रोवला आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here