चिपळूण ; पिंपळी खुर्द येथील तलाठ्याला 45000 हजाराची लाच घेताना पकडले…

0
632
बातम्या शेअर करा

चिपळूण – चिपळूण तालुक्यातील पिंपळी खुर्द येथील तलाठ्याला 45000 हजाराची लाच घेताना पकडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली.

अतिरिक्त पदाचा कारभार असलेला तलाठी अश्विन नंदगवळी यांनी तक्रारदार व त्यांचे सहहिस्सेदार यांच्या नावे असलेल्या बिनशेती जमिनीचे दोन समान हिस्से करून उपविभागीय अधिकारी कार्यालय, चिपळूण यांच्याकडून बिनशेती जमिन विभाजनाचे आदेश प्राप्त करून घेण्याकरिता रु. 45,000/- हजाराची मागणी केली आणि ती घेताना तो आज पकडला गेला.

या घेतलेल्या पैशांमध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालय, चिपळूण येथील कर्मचारी यांच्यासाठी रु. 40,000/- व वेगळा सातबारा देण्याकरिता मंडळ अधिकारी यांच्यासाठी रु. 5,000/- असे एकूण रु. 45,000/- लाच रक्कमेची मागणी केल्याचे पडताळणी दरम्यान निष्पन्न झाले.

त्याअनुषंगाने आज सापळा करुन कारवाई करण्यात आली ही कारवाई रत्नागिरी येथील ला.प्र.वि., रत्नागिरी सापळा पथक यांनी केली यामध्ये PI प्रविण ताटे, HC संतोष कोळेकर, PC हेमंत पवार, PC राजेश गावकर,PC प्रशांत कांबळे ( चालक ) आदींचा सहभाग होता.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here