गुहागर – गुहागर तालुक्यातील श्री सिद्धिविनायक विद्यामंदिर मुंढर या शाळेमध्ये दिनांक 25 व 26 नोव्हेंबर या दिवशी गुहागर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये गुहागर तालुक्यातील जवळपास सर्वच शाळांनी सहभाग घेतला होता.
कोरोनाच्या प्रदीर्घ अशा कालावधीनंतर पहिल्यांदाच शालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्यामुळे सर्वच स्पर्धकांमध्ये याचा उत्साह याप्रसंगी दिसून आला त्या स्पर्धेमध्ये तालुक्यातील एकूण 21 शाळांचा सहभाग होता त्यापैकी वय वर्षे 14 वयोगटाखालील सोळा संघ,17 वयोगटातील चोवीस संघ, 19 वयोगटातील नऊ संघ असे मुले व मुली मिळून एकूण 49 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.
या स्पर्धेचे उद्घाटन डॉ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठानचे सचिव दिलीप गोखले यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी अजित साळवी संचालक नातू प्रतिष्ठान, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती गुहागर, तालुका समन्वयक मोरे,मोहिते,मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष गोरीवले,कुलकर्णी ,श्री सिद्धिविनायक विद्यामंदिर मुंढरचे माजी विद्यार्थी त्याचबरोबर मुंढर गावचे सरपंच सुशील आग्रे, माजी सरपंच विजय रामाने व चिखली आणि मुंढरचे ग्रामस्थ उपस्थित होते.
मुंढर हायस्कूलचे मुख्याध्यापक साठे सर यांनी सर्वप्रथम सर्वांचे स्वागत केले व ही स्पर्धा ज्या सर्व क्रीडा शिक्षकांमुळे व शाळेच्या सर्व सहकाऱ्यांमुळे खिळीमेळीच्या वातावरणात पार पडली त्या सर्वांचेच शाळेच्या वतीने आभार मानण्यात आले.
सदर स्पर्धेमधील अंतिम विजेता ठरलेल्या संघांची नावे पुढीलप्रमाणे.
14 वयोगटातील मुले – गुहागर संघ
17 वयोगटातील मुले – गुहागर संघ
19 वयोगटातील मुले – पालशेत संघ
14 वयोगटातील मुली – गुहागर संघ
17 वयोगटातील मुली – मुंढर संघ
19 वयोगटातील मुली – पाटपन्हाळे संघ