खेड ; भेसळयुक्त चहा पावडर जप्त, जिल्ह्यात अनेक ठिकाणी अशीच चहा पावडर असण्याची शक्यता..

0
352
बातम्या शेअर करा

खेड – रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरातील विष्णू महादेव पाटणे अॅण्ड सन्स या घाऊक दुकानावर जिल्हा अन्न व औषध प्रशासनाने टाकलेल्या धाडीत भेसळयुक्त ६५ किलो चहा पावडर जप्त केली आहे.

जप्त केलेल्या चहा पावडरची किंमत सुमारे २० हजार इतकी आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.याआधीही , जून महिन्यात याच दुकानातून क्लासिक टीचा एक नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला होता. या नमुन्याबाबत आलेल्या अहवालात घातक व खाण्यास असुरक्षित असल्याचे निष्पन्न झाले होते.अन्न व औषध प्रशासनाने २० हजारांची चहापत्ती जप्त केली आहे. या धाडीवेळी जप्त केलेल्या चहा पावडरच्या नमुन्याची घटनास्थळी चाचणी केल्यानंतर भेसळयुक्त असल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढला होता. या धाडीत आधीपासूनच सदोष असलेला क्लासिक टी या बँडचा साठा सापडला. शिवाय यासोबतच लिफ्टन व शिफ्टन असे ठराविक ब्रॅण्डसारख्या नावाचा भास निर्माण करणारे चहापत्तीचे २ साठे सापडले.स्पॉट तपासणीवेळी चहापत्ती एका भांड्यात टाकून तपासली गेली, ज्यातून पिवळा रंग बाहेर आला, ज्यातून रासायनिक रंग प्रथमदर्शनी प्रशासनाला आढळला. दरम्यान, तिन्ही प्रकारच्या क्लासिक टीव्यतिरिक्त इतर २ नमुने प्राथमिक तपासणीत भेसळयुक्त असल्याचा संशय आल्याने त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यात नेमके काय मिसळण्यात आले आहे, हे स्पष्ट होणार आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांच्या निर्देशानुसार सहआयुक्त कोकण विभाग सुरेश देशमुख, रत्नागिरीचे सहायक आयुक्त दीनानाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व अन्न सुरक्षा अधिकारी दशरथ बांबळे, विजय पाचुपते यांच्यातर्फे करण्यात आली.रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात देखील अशा प्रकारे बोगस चहा पत्ती वापरण्यात येत असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाने दखल घेऊन गुहागर तालुक्यात सुद्धा अशी रेड करावी अशी मागणी आता जोर धरत आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here