चिपळूण – चिपळूण येथील मध्यवर्ती एस.टी.बस स्थानकाच्या रखडलेल्या कामाबाबत शिवसेनेसह सर्वपक्षीयांनी आवाज उठवला तरीही प्रशासनाला अद्याप जाग येत नाही. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
आता या कामाला महिनाभरात सुरुवात करा अन्यथा चिपळूण बस स्थानकात गाई म्हशी आणि कोंबड्या कुत्री गाढव आणून बांधणार असल्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे गुहागर विधानसभा मतदारसंघ चिपळूणचे तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी दिला आहे.चिपळूण बस स्थानकाच्या कामाला चार वर्षांपूर्वी सुरुवात झाली चार वर्ष अतिशय संत गतीने काम सुरू आहे सुरुवातीला पिलर साठी उभे केले स्टील आता गंजले आहे काम अर्धवट स्थितीत असून जुने इमारत जमीन नष्ट करण्यात आली त्यामुळे प्रवाशांना अतिशय जागेत वावरे लागत आहे एखाद्या फुलावर लागलेली गाडी पाहण्यासाठी धावपळ करावी लागते ऊन पाऊस झेलत ग्रामीण भागातला सामान्य प्रवासी गेली चार वर्षे त्रास सहन करत आहे परंतु एसटी प्रशासनाला हे दिसत नाही असा प्रश्न तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी विचारला आहे हे एसटी बस स्थानक व्हावे यासाठी प्रशासनाचे श्राद्ध घालून झाले तरी यंत्रणेला जाग नाही चार वर्षात कामाचे अजिबात प्रगती नाही ठेकेदारांची तोंड दिसत नाही आमचे सरकार असतानाही आम्ही आवाज उठवला होता व आताही उठवत आहोत.आता हद्द झाली का वेळ सुरू न करता जनतेला भेटीस धरण्याचा हा प्रयत्न सहन करणार नाही या पूर्ण बांधकामाच्या ठिकाणी गाई म्हशी कोंबडी कुत्री गाढव आणून बांधून निषेध व्यक्त करण्यात येईल असे तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी सांगितले यावेळी विभाग प्रमुख राज डिगे दिये व सहकारी उपस्थित होते.