गुहागर -गेले काही दिवस कडक उन्हाळा असताना शुक्रवारी संध्याकाळी अचानक ढगाळ वातावरण निर्माण होऊन वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. कडक उन्हाळा सुरू असतानाच अचानक पावसाने हजेरी लावून सर्वांनाच गारवा दिला.
गेले आठवडाभर उन्हाने सर्वानाच हैराण करून सोडले होते.उन्हाने लाहीलाही होत असल्याने अनेकजण पावसाची प्रतीक्षा करत होते.थोडाफार पाऊस यावा आणि वातावरणात गारवा निर्माण व्हावा अशी आशा सर्वानाच होती अखेर शुक्रवारी संध्याकाळी अचानक वादळी वाऱ्याने सुरवात केली आणि त्यांनतर पावसाने हजेरी लावत वातावरणात गारवा निर्माण केला. मात्र अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे पहावयास मिळाले.