एसटी संप ; एसटी कामगारांना सरकारने दिला हा पर्याय …

0
823
बातम्या शेअर करा

मुंबई – राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कामगारांचे प्रतिनिधी तसेच आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशी आज संपावरील तोडग्याबाबत चर्चा केली. या चर्चेअंती सरकारने न्यायालायीन समितीचा अहवाल येई पर्यंत तसेच एसटी कामगारांचे चालले आंदोलन संपावे यासाठी काही पर्याय दिले आहेत. या पर्यायामध्ये अंतरिम वाढ कामगारांना देण्याचा प्रस्ताव देण्यात आला असल्याची माहिती अनिल परब यांनी दिली. त्यामुळे एसटीचा हा सुरू असलेला संप आता संपण्याची चिन्हे दिसत असून लवकरच एसटी कामगार कामावर रुजू होतील असे वातावरण दिसू लागले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here