गुहागर -गेली ६ वर्षे गुहागर पोलीस ठाणेमध्ये पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत असणारे राजू कांबळे यांची नुकतीच कोल्हापूर येथे बदली झाल्याने पोलीसमित्र राजू कांबळे यांच्या असंख्य मित्रपरिवाराने राजू कांबळे यांचे अभिनंदन करून भावी सेवा व कार्य तसेच आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. गुहागर पोलीस ठाणे येथे कार्यरत असताना राजू कांबळे यांना पोलीस नाईक पदावर बढती मिळाली. सदर बढतीनंतर राजू कांबळे यांची कोल्हापूर येथे बदली झाली आहे.
पोलीसमित्र राजू कांबळे यांचा प्रेमळ स्वभाव, मदतकार्य, शांत व संयमी व्यक्तिमत्त्व या गुणांमुळे गुहागर तालुक्यातील नागरिकांना राजू कांबळे हा मित्र पोलीसमित्र म्हणून परिचित झाला होता. मित्रपरिवार व जनसंपर्क अधिक असल्याने राजू कांबळे म्हणजे मित्रत्वाचे नाते जडले. मित्रत्वाचे नाते व अधिक संपर्कामुळे राजू कांबळे यांच्या बदलीमुळे असंख्य मित्रपरिवाराने शुभेच्छा कार्यक्रम केला.मित्रांचे व गुहागर वासियांचे प्रेम व सहकार्य लाभले आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर वासियांसारखी प्रेमळ माणसे मिळणे हे भाग्यच आहे तशी प्रेमळ प्रतिक्रिया राजू कांबळे यांनी व्यक्त केली. नुकत्याच घडलेल्या झोंबडी येथील चोरी मध्येही चोरांना पकडण्यात राजू कांबळे यांचे मोठे योगदान आहे .आज पर्यंत तालुक्यामधील तसेच तालुक्याच्या बाहेरील घडलेल्या घटनांमधील आरोपींना पकडण्या मध्ये राजू कांबळे यांचा हातखंडा होता. राजू कांबळे यांचे नेटवर्क ही चांगल्या प्रकारे होते. त्यामुळे त्यांना या गोष्टी शक्य होत होत्या तालुक्यामध्ये ते पोलीस म्हणून कमी तर मित्र म्हणून जास्त वागत होते.