त्यांनी तर धमकीच दिली…. आम्ही त्या डॉ.पुजारीची शिवसेना स्टाईलने समाचार घेऊ – संदीप सावंत

0
796
बातम्या शेअर करा


चिपळूण :- कोरोनाच्या नावाखाली उपचार आणि औषधांचे लाखो रुपयांची बिले तयार करायची….बेजबाबदारपणे वागून अनेक रुग्णांचे बळी घ्यायचे…आणि ” मी तो नव्हेच” म्हणत लखोबा लोखंडेची भूमिका घेऊन कायद्याची धमकी द्यायची….ही मस्ती आणि मुजोरी शिवसैनिक अजिबात खपवून घेणार नाहीत.प्रतापराव शिंदेंनी फक्त तोंडी धमकी दिली.शिवसैनिक जर मैदानात उतरला ना तर पळता भुई थोडी होईल.आशा शब्दात तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी डॉ.पुजारी यांना इशारा देत प्रतापराव शिंदे यांच्या भूमिकेचे पूर्ण समर्थन केले आहे.
चिपळूण शहरातील सिद्धिविनायक हॉस्पिटलचे डॉ.विशाल पुजारी आणि शिवसेनेचे तालुकाप्रमुख तथा उपसभापती प्रतापराव शिंदे यांच्यामध्ये दोन दिवसांपूर्वी माजी सैनिक मोरे यांचा मृत्यू तसेच हॉस्पिटल बिल आणि मृतदेह या विषयावरून वाद झाला होता.या प्रकरणी डॉ.पुजारी यांनी थेट पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा इशारा दिला आहे.त्यामुळे चिपळूण शिवसेना आक्रमक झाली आहे.
शिवसेना तालुकाप्रमुख संदीप सावंत या बाबत म्हणाले प्रतापराव शिंदे हे शिवसेनेचे नेतृत्व तर आहेच पण ते चिपळूण तालुक्याचे उपसभापती म्हणून सर्वसामान्य लोकांचे देखील नेतृत्व आहे.त्यांना कोणी बोलावण्याची किंवा विनंती करण्याची गरज नाही.त्यामुळे डॉ.पुजारी यांनी थोडा अभ्यास करावा.ते का हॉस्पिटलमध्ये का आले.?कोणी बोलावले हे अडाणीपणाचे प्रश्न उपस्थित करू नये.ते स्थानिक नेतृत्व आहे.आणि डॉ.पुजारी चिपळूणमध्ये भाडोत्री आहेत.याचे आत्मपरीक्षण करावे.आणि कसल्या धमक्या देता.?कोणाला तरी हाताशी धरून असल्या फुसक्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही.तुमच्याकडे पुरावे आहेत ना.मग त्यापेक्षा जिवंत लोकांचे समोरासमोरचे पुरावे आमच्याकडे देखील आहेत.कसे कोणाला पीडले गेले.! बेजबाबदारपणे वागून किती रुंगणाचे बळी तुम्ही घेतलेत.हे सर्व प्रतिज्ञापत्रावर समोर आणू.तुमच्या बेजबाबदार वागण्यामुळे एका २७ वर्षीय तरुणाचा जीव गेलाय हे मी समोर बघितले आहे.त्यामुळे शिवसैनिकांना धमक्या आणि स्वतःचे वातावरण निर्माण करण्याचे हे नाटक बंद करा…कुठे तक्रार करायची ती करा…आम्हालाही कायदा माहीत आहे.आणि तुम्ही रत्नागिरीतुन का पळून आलात हे देखील माहीत आहे. मालमत्ता आणि आर्थिक उलाढाल याची गेल्यावर्षभराची कुंडलीदेखील तयार आहे.
तुमच्याकडे व्हिडीओ आणि कागदपत्र आहेत ना…आमच्याकडे शेकडोजण असे तयार आहेत जे सामोरासमोर तुमचा पंचनामा करतील ते ही सर्व कागदपत्रांसह त्यामुळे आपल्या औकातीत राहा.प्रतापराव शिंदे,विनोद झगडे हे फक्त तोंडी बोललेत.शिवसैनिक जर मैदानात उतरला ना.तर पळताभुई थोडी होईल..हे चिपळूण आहे.येथे मस्ती आणि मुजोरी खपवून घेतली जाणार नाही.आशा आक्रमक शब्दात संदीप सावंत यांनी डॉ.पुजारी यांना सुनावत प्रतापराव शिंदे आणि विनोद झगडे यांच्या भूमिकेचे जोरदार समर्थन केले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here