गुहागर: -लोकनेते स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान, गुहागर संस्थेच्या वतीने गुहागरचे माजी सभापती स्व. सदाशेठ आरेकर याच्या स्मृतीदिनानिमित्त गुहागर तालुक्यातील धोपावे गावाला टँकर द्वारे मोफत पाणी पुरवठा होणार आहे.
धोपावे गावी दरवर्षी एप्रिल, मे अशा उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याची मोठया प्रमाणात टंचाई भासते दरवर्षी टँकरद्वारे पाणी गावातील लोक आणतात, यावर्षी माजी सभापती स्व. सदानंद आरेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त दि. २३ मे २०२१पासून दि.२५ मे २०२१पर्यंत रोज एक टँकर अशा स्वरूपात मोफत पाणी पुरवठा लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने केला जाणार आहे.