गुहागर – रत्नागिरी जि. प. अध्यक्षपदासाठी आमदार भास्कर जाधव यांचे पुत्र विक्रांत जाधव यांचे नाव जाहीर झाले आहे रत्नागिरी जिल्हा परिषदेतील अध्यक्ष पदाच्या निवडीचा पेच अखेर सुटला असला तरी ज्येष्ठ सदस्यउदय बने यांची समजूत काढताना खात्याच्या निवडीत मोठे फेरबदल करण्यात आले. उपाध्यक्षपद उदय बने यांना देताना त्यांच्याकडे बांधकाम व आरोग्य समितीचापदभार देण्यात आला आहे.
सोमवारी सकाळी नावे अंतिम करण्यातआली. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसह महिला व बालकल्याण समिती सभापती पदासाठी भारती सरवणकर,शिक्षण सभापती पदासाठी चंद्रकांत मणचेकर,समाजकल्याण परशुराम कदम तर कृषी सभापती पदासाठी रेश्मा झगडे यांची नावे निश्चित करण्यात आली आहे.