खुशखबर : राज्यात उद्यापासून एसटीची आंतरजिल्हा वाहतूक सुरु

0
670
बातम्या शेअर करा

मुंबई – अखेर बाप्पा पावला असे म्हणावे लागेल कारण गणेशोत्सव आणि राज्यातील नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता उद्या २० ऑगस्टपासून राज्यात एसटीची आंतरजिल्हा वाहतूक सुरु करण्यात येणार आहे. याकरिता ई पासची आवश्यकता नाही. त्यामुळे राज्यातील नागरिकांना सह कोकणातील गणपती सणासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे राज्यातील एसटीची धाव २३ मार्चपासून बंद ठेवण्यात आली आहे. २२ मे पासून राज्यातील रेड आणि कंटेनमेंट झोन वगळता जिल्ह्यांतर्गत वाहतूक सुरु करण्यात आली. गणेशोत्सवासाठी नागरिकांना प्रवास करता यावा याकरिता देखील एसटीची वाहतूक सुरु करण्याची मागणी आहे. त्यानुसार राज्य सरकारने एसटी महामंडळाला आंतरजिल्हा वाहतूक सुरु करण्यास परवानगी दिली आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here