रत्नागिरीत मुसळधार ; संगमेश्वरमध्ये बावनदीने धोक्याची पातळी ओलांडली…..

0
204
बातम्या शेअर करा

रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पावसाचे थैमान सुरूच आहे. तसेच पावसाचा जोर कायम आहे. मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने जिल्ह्यात अनेक भागात पुराचे पाणी घुसले आहे. संगमेश्वर तालुक्यातील बावनदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

त्यामुळे बावनदीवरील ब्रिटिशकालीन पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पूल बंद करण्यात आल्याने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. याशिवाय जगबुडी नदी देखील धोका पातळीवर वाहात आहे. वशिष्टी, काजळी, कोदवली, शास्त्री, सोनवी, मुचकुंदी या नद्याना देखील पूरस्थिती आहे.तर  अतिवृष्टीमुळे चांदेराई बाजारपेठ पूर्णपणे पाण्याखाली गेली असून अनेक घरात पाणी घुसले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here