मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय: कार्याध्यक्षपदी शीतल करदेकर तर प्रमुख कार्यवाहपदी रविंद्र गावडे…

0
62
बातम्या शेअर करा

मुंबई – शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करणा-या , महाराष्ट्राचा मानबिंदू व समृद्ध वारसा असणाऱ्या “मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या” कार्याध्यक्षपदी  सौ शीतल करदेकर यांची तर , कार्यवाहपदी सौ उमा नाबर व सौ शिल्पा पितळे यांची निवड करण्यात आली. संस्थेच्या 125 वर्षाचे काळात महत्वाचे पदाचा मान कर्तृत्ववान महिलांना देण्यात आला! 

कार्योपाध्यक्षपदी  मारूती नांदविस्कर, प्रमुख कार्यवाहपदी रविंद्र गावडे, कोषाध्यक्ष प्रदीप ओगले, श्री जयवंत गोलतकर, सचिव-सौ उमा नाबर, उदय सावंत , सौ शिल्पा पितळे   यांची निवड करण्यात आली. नुकत्याच झालेल्या निवडणूकीत 34 साधारण सभा सदस्यांमधूनजयवंत गोलतकर,सुरेंद्र  करंबे,.उदय  सावंत,.रवींद्र गावडे .सुनील राणे, विनायक परब प्रदीप ओगले, हेमंत जोशी,मनीष मेस्त्री,सौ.शीतल करदेकर,.मारुती नांदविस्कर ,सौ. उमा नाबर .सूर्यकांत गायकवाड,सौ.शिल्पा पितळे, स्वप्निल लाखवडे  हे 15 सदस्य बिनविरोध कार्यकारिणीवर  निवडून आले होते.  शुक्रवार  दि 29 रोजी उपाध्यक्ष डॉ भालचंद्र मुणगेकर  यांच्या  अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत  आठ पदाधिकाऱ्यांची निवड खेळीमेळीच्या वातावरणात सर्वसहमतीने करण्यात आली. 
या बैठकीस कार्यकारिणी सदस्यांसह  उपाध्यक्ष सौ विद्या चव्हाण, प्रभाकर  नारकर,प्रदीप कर्णिक, विश्वस्त प्रताप आसबे , अरविंद तांबोळी, मावळते प्रमुख कार्यवाह सुभाष नाईक उपस्थित होते.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here