राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षानी दिले पत्रकारांना चलेजाव चे आदेश…..

0
502
बातम्या शेअर करा

गुहागर- नियोजित वेळेपेक्षा तब्बल चार तासाने गुहागर मध्ये सभेला आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सभेच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पत्रकारांना पाहून त्यांना एकप्रकारे भय वाटल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी सभेला सुरुवात होण्यापूर्वीच पञकारानी येथून जावे, असा ‘चलेजाव’ चा एकप्रकारे इशारा दिल्याने पञकारामध्ये एकच खळबळ उडाली.

गुहागर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची सभा शृंगारतळी येथील पूजा मंगल कार्यालयात काल गुरूवारी दुपारी दीड वाजता आयोजित करण्यात आली होती. या सभेला राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील पञकाराना निमंत्रित केले होते. दुपारी दीड वाजता सुरु होणाऱ्या या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तब्बल चार तास उशिरा आले. त्यामुळे ही सभा संध्याकाळी 4.30 वाजता सुरु झाली. सभा सुरू होण्यापूर्वीच जयंत पाटील यांनी पञकाराना पाहून तुम्ही येथून जा, तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे आहेत ते सभेनंतर विचारा असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर सगळेच पत्रकार बाहेर पडले. मुळात या कार्यक्रमाला यावे असे निमंत्रण तालुका राष्ट्रवादी कडून देण्यात आले असताना पक्षाच्या वरिष्ठांकडून अश्या प्रकारच्या कृतीमुळे पत्रकारांमधून नाराजी व्यक्त होतेय.

गुहागर शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे गुहागर तालुक्यातील राष्ट्रवादीमध्ये चैतन्याचे वातावरण पाहायला मिळतंय. मात्र असे असले तरीही राजेश बेंडल हे कार्ड मतदार संघात तर दूर पण गुहागर शहरात तरी कितपत चालेल याविषयी अनेक तर्क वितर्क सुरू आहेत..राष्ट्रवादी काँग्रेस कडून राज्यभर राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा सुरू केली आहे,आज ही यात्रा कोकणातील गुहागर मतदार संघात आली असताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुरवातीलाच पत्रकारांना लक्ष करत भर सभेत अश्या पद्धतीने फर्मान काढल्यामुळे तालुक्यातील पत्रकारांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here