म्यूकरमायकोसीस म्हणजे काय? ; त्यांची लक्षणे कोणती?….

0
640
बातम्या शेअर करा

कोविड झालेल्या रूग्णांना राज्यात काही ठिकाणी म्यूकरमायकोसीस या बुरशीजन्य (काळी बुरशी) आजाराची लागण झाल्याचे समोर आले आहे. खबरदारी म्हणून आजाराविषयी खरी माहिती आत्मसात करणे गरजेचे आहे. म्यूकरमायकोसीस या आजाराचे निदान वेळेत झाल्यास रूग्ण गंभीर स्थितीमध्ये न जाता त्याचा आजार बरा होतो असे राज्यात दिसून आले आहे.

इंडियन मेडीकल असोसिएशन द्वारा म्यूकरमायकोसीस बाबत मार्गदर्शक तत्वेही जाहीर करण्यात आली आहेत. म्यूकरमायकोसीस या आजाराला काळी बुरशी असेही म्हटले जाते. हा बुरशीजन्य आजार असून शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती जास्त प्रमाणात कमी झाल्यामुळे होतो. नुकतेच शासनाकडून या आजाराला साथरोग आजार म्हणूनही घोषित करण्यात आले आहे. यामुळे आरोग्य विभाग प्रशासन या रोगाबाबत सामान्य नागरिकांमध्ये जनजागृती करीत आहे. यातून लक्षणे असलेल्या संशियित रूग्णांना वेळेत उपचार व्हावेत हा उद्देश आहे. आपण हा आजार काय आहे तो समजून घेवूया.

म्युकरमायकोसीस म्हणजे काय आहे –
म्युकरमायकोसीस (काळी बुरशी) हा बुरशीजन्य आजार असुनही बुरशी माती, वनस्पती, हवा, खराब झालेली फळे व भाजीपाला, शेण इत्यादी ठिकाणी आढळते. तसेच ही बुरशी निरोगी माणसाच्या नाकामध्येही आढळून येवू शकते.
या आजारामध्ये प्रामुख्याने सायनस मध्ये बाधा होते तेथून डोळे, मेंदू, जबडा तसेच फुफ्फुसापर्यंत पसरु शकतो. मधुमेह असलेले रुग्ण, तसेच रोग प्रतिकारकशक्ती कमी असलेल्या व्यक्ती, कॅन्सर बाधित रुग्ण, एचआयव्ही-एड्स बाधित रुग्ण व सद्यास्थितीत कोविड करीता स्टेरॉईडचे उपचार घेणारे रुग्ण इ.मध्ये या बुरशीच्या संसर्ग झाल्यास गंभीर स्वरुपाचा आजार उद्भवू शकतो. या आजारमध्ये मृत्युदर 50 टक्केच्या आसपास असून स्टेरॉईडचा वापर या आजाराची लागण होण्यातील एक प्रमुख घटक आहे. स्टेरॉईडमुळे फुफूसामधील दाब कमी होतो व त्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीच्या अनियंत्रीत प्रतिक्रियेमुळे होणारे नुकसान टाळले जाते. तथापि यामुळे मधुमेह असलेल्या व नसलेल्या दोन्ही व्यक्तीच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते तसेच रोगप्रतिकारक शक्ती कमी होते ते
म्युकरमायकोसीस होण्यास कारणीभूत ठरते त्यामुळे मधुमेह असणाऱ्या व्यक्तीमध्ये रक्तातील साखरेचे नियंत्रण हे खूप महत्वाचे आहे. साधारणपणे कोविड मधुन उपचारानंतर बरे झालेल्या कोविड पश्चात एक महिन्यापर्यंत म्युकरमायकोसीस होण्याची शक्यता अधिक असते.

आजारासाठी कारणीभूत होणारे घटक – अनियंत्रीत मधुमेह औषधांचा उपचारात वापर, स्टेरॉईडच्या वापरामुळे प्रतिकारशक्ती कमी होणे, इम्यूनोमॉडूलेटर औषधाचा उपचारात वापर, दीर्घकाळ आयसीयुमध्ये उपचार, दीर्घकाळ ऑक्सीजनवरील उपचार ( नॅसल प्राँगचा वापर करुन ), सहव्याधी (अवयव बदली किंवा कॅन्सर), होरीकॉमेझोल उपचार, दिर्घकाळासाठी टयूबमधुन अन्न देणे, हुमिडीफायर बॉटलचे कंटामिनेशन, उच्च प्रतिजैविकाचा दीर्घकाळासाठी वापर, किडणी व लिव्हरचे जुने आजार इत्यादी.

संशयित रुग्ण व जोखमीची लक्षणे असलेला व्यक्ती कसा
शोधावा

  • साधारणपणे म्युकरमायकोसीस संशयित रुग्ण पुढिल लक्षणावरुन ओळखता येईल. यात डोळे दुखणे, नाक बंद होणे, चेहऱ्यावर बधीरता येणे, दिसायला कमी किंवा दोन दोन प्रतिमा दिसणे, डोळयाला सूज येणे, डोळा लाल होणे, डोळे दुखून उलटी होणे, वागण्यामध्ये बदल (नातेवाईकांना विचारणे), नाकातुन रक्त किंवा काळा स्त्राव येणे, सध्या म्युकरमायकोसीसच्या रुग्णामध्ये वाढ झालेली असल्याने म्युकरमायकोसीस या आजाराचा साथरोग आजारामध्ये समावेश केलेला असल्यामुळे त्याचे नियमित सर्वेक्षण होणे आवश्यक आहे. या माध्यमातुन रुग्णांचा लवकर शोध घेवून त्यांना उपचाराखाली आणता येईल व रुग्णांमधील गंभीर आजार आणि मृत्यू टाळता येतात.

बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here