खेड ; कशेडी घाटात रसायन ड्रम घेऊन जाणारा ट्रक उलटला

0
353
बातम्या शेअर करा

खेड – (प्रसाद गांधी) – रसायन भरलेले ड्रम घेऊन मुंबईहुन गोव्याच्या दिशेने घेऊन जाणारा ट्रक चालकाचा ताबा सुटून उलटल्याची घटना मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील कशेडी आंबा येथे घडली. या अपघातात ट्रक चालक जखमी झाला आहे.

मुंबई ते गोवा जाणारा ट्रक (एमएच ०६, बीडब्लू ०२१५) चालक सुरज चंद्रकांत शेडगे हा ट्रकमध्ये कपडे बनविण्याचे क्रॉस आर-४००, कॉलॉरीन -६०० व दिस्पेर-एक्स या रसायनाने भरलेले ड्रम घेऊन जात गोव्याकडे जात होता. कशेडी घाटात आंबा स्टॉपजवळ एका अवघड वळणावर चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला. त्यामुळे ट्रक रस्त्याच्या उजव्या बाजूस उलटला अपघातामध्ये ट्रकमधील रसायनाचे ड्रम खाली पडून फुटल्याने रसायन रस्त्यावर पसरले होते. मात्र, हे रसायन ज्वलनशील अथवा घातक नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले़ या अपघाताची माहिती समजतात कशेडी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक फौजदार यशवंत बोडकर व पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. अपघातामध्ये चालक सुरज शेडगे याच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली असून, त्याला कळंबणी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here