गुहागर ; देवघर येथील अथर्व बेपत्ता

0
2904
बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर तालुक्यातील देवघर येथे रहाणारा अथर्व गोंधळेकर आज पहाटे बेपत्ता झाला आहे. सकाळी सायकल घेवून तो घरातून बाहेर पडला. परत न आल्याने गोंधळेकर कुटुंबियांनी शोधाशोध केली. सायंकाळपर्यंत तो घरी परतेल. अशी आशा सर्वांना होती. मात्र अथर्व परत न आल्याने कुटुंबियांनी अर्थव बेपत्ता झाल्याची तक्रार गुहागर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.

देवघर भाग्यनगर येथे रहाणारे जीतेंद्र गोंधळेकर सैन्यदलातून निवृत्त झाले आहेत. सध्या ते आरजीपीपीएल वसाहतीच्या सुरक्षा व्यवस्थेत अधिकारी म्हणून काम करतात. त्यांचा मुलगा अथर्व हा. 31 मार्च 2021 ला सकाळी सायकल घेवून घरातून बाहेर पडला. घरातील मंडळींना वाटले की, अथर्व फेरफटका मारुन पुन्हा घरी येईल. त्यामुळे तो काय घेवून जातोय याकडे कोणी लक्ष दिले नाही. मात्र सकाळी 10 वाजेपर्यंत अर्थव घरी आला नाही. स्वाभाविकपणे तो कोणा मित्राकडे गेलाय का, आजुबाजुच्या परिसरात कुठे रमलाय का, याची चौकशी सुरु झाली. परंतु अथर्वचा पत्ता लागला नाही. अथर्वसोबत घरातील कोणत्याच व्यक्तिचा वाद, भांडण झाले नव्हते. अभ्यासावरुनही त्याला कोणी रागावले नव्हते. त्यामुळे अथर्व काही वेडावाकडा विचार करेल असे कोणाच्याच मनात आले नाही.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here