खेड ; लोटे औद्योगिक वसाहतीतील डेरा पेन्ट्स कंपनीच्या आवारात रासायनिक कच-याला भीषण आग

0
297
बातम्या शेअर करा


खेड : लोटे औद्योगिक वसाहतीतील दुर्गा केगिकल्स कंपनीला लागलेल्या भिषण आगीचे घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा लोटे औद्योगिक वसाहतीतील एका बंद कंपनीच्या आवारात रासायनिक कचऱ्याला आग लागल्याने लोटे औद्योगिक वसाहतीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दर दोन दिवसाआड औद्योगिक वसाहतीत अशा भिषण आगी लागत असतील तर या आगी लागतात की लावल्या जातात? असा सवालही उपस्थित केला जात आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार लोटे औद्योगिक वसाहतीत बंद पडलेली डेरा पेन्ट्स ही कंपनी लासा सुपर जनरिक या कंपनीने विकत घेतली आहे. सध्या डेरा पेन्ट्स ही कंपनी बंद असल्याने लासा सुपर जनरीक कंपनीचा रासायनिक कचरा डेरा पेन्ट्स या कंपनीच्या आवारात ठेवला जातो. कंपनी बंद असल्याने आवारात मोठ्या प्रमाणात गवतही वाढले आहे.
आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास कंपनीच्या आवारात असलेल्या कचऱ्याला आग लागली आणि वाळलेल्या गवतामुळे बघता बघत आगीने रौद्र रुप धारण केले. डेरा पेन्ट्स या बंद कंपनीच्या आवारातून आगीच्या ज्वाला झेपावू लागताच लोटे औद्योगिक वसाहतीत घबराट निर्माण झाली.
आगीची खबर मिळताच लोटे औद्योगिक वसाहतीचे दोन फायर फायटर घटनस्थळी दाखल झाले. अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र रासायनिक कचऱ्यामुळे आग आटोक्यात येत नव्हती. दरम्यान खेड नगरपालिकेचा फायर फायटर घटनास्थळी दाखल झाला. तीन फायर फायटरच्या सहाय्याने चार तासाच्या अथक प्रयत्नांने भडकलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र उशीरपर्यंत ही आग धुमसतच होती.
लोटे औद्योगिक वसाहतीतील रासायनिक प्रदुषणामुळे या परिसरातील जनता आधीच हैराण झाली आहे. आंबा, काजू ही नगदी पिकं राहिलेली नाहीत, जलस्रोत दुषीत झाल्याने नागरिकांच्या आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. प्रदुषणाबाबत सतत बोंब सुरु असतानाच आता वारंवार लागणाऱ्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदुषण होत असल्याने ज्या कंपनीचा हा रासायनिक कचरा होता त्या
लासा सुपर जनरिक या कंपनी व्यवस्थापनावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here